नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महापालिका मुखायलय येथील विरोधी पक्ष नेता आणि गटनेता यांच्या कार्यालयाला आग लागून आठ दिवस लोटले असून देखील आगीबाबतचा अहवाल आजून न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान आज विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी ह्या कार्यालयाची पाहणी करून प्रशासन आजून एखाद्या घटनेनंतर अहवाल देणार आहे का असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आठ दिवसांपूर्वी ह्या कार्यालयाला आग लागली होती त्यात बरेच नुकसान झाले होते याबाबत आयुक्तांनी दोन दिवसात आगीचे अहवाल आल्यांनातर संबंधित दोषींवर कार्यवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र आजून देखील याबाबतचा अहवाल न आल्याने आता विरोधी पक्ष नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
“आम्हाला कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचं नाही, मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचं निदान विश्लेषण होणं तरी गरजेचं आहे. मात्र यात कुणीही पुढाकार घेत नाहीये” अशी खंतही अजय बोरस्ते यांनी व्यक्त केली.