नाशिक: भांडण सोडवायला गेलेल्या महिलेचा चाकू खुपसून खून
नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी शहरात एका महिलेची हत्या झाल्याने शहर पुन्हा या हत्येने हादरले आहे.
हत्येने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या सात महिन्यातील ही तिसरी घटना असुन या महिलेची हत्या करून आरोपी फरार झाले आहे.
जकीया शेख असे मृत महिलेचे नाव आहे.
- नाशिक: सिबीएस चौकात सिटीलिंक बसने धडक दिल्याने पादचारी ठार
- नाशिक: धूमस्टाईल पाठलाग! पुष्पा पॅटर्न तस्करीचा डाव उधळला, दोघे संशयित ताब्यात
या बाबत अधिक माहिती अशी की, गायकवाड नगर येथील संशयित आरोपी आणि त्याच्या आईत झालेला वाद मिटविण्यासाठी जकीया शेख गेल्या होत्या. मात्र हा वाद मिटवत असताना आरोपीने या महिलेचा धारदार शस्त्राने केला खून केला. या हत्येने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या सात महिन्यातील ही तिसरी खुनाची घटना असुन हत्या करून आरोपी फरार झाले आहे.
घराजवळच राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने छातीत चाकू खुपसून महिलेचा खून केलाय आलाय असा संशय आहे. जकीया शेख महेमूद असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी रात्री संशयित आरोपी जॉन मानवेल हा महिलेच्या घरी आला होता. “माझ्या आईने पोलिसांकडे माझी तक्रार केली आहे तिला समजण्यासाठी माझी घरी चला” असे सांगून संशयित आरोपीने जकीया शेख यांना घेऊन गेल्याची प्राथमिक माहिती असून संशयित आरोपी फरार असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. इगतपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
घटनास्थळी पोलीस उप अधिक्षक अर्जुन भोसले यांनी पाहणी केली असुन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.