नाशिक: अंबड हद्दीत संशयितांकडून गावठी कट्ट्यासह हत्यार हस्तगत

नाशिक: दोन संशयितांकडून गावठी कट्ट्यासह हत्यार हस्तगत

रोशन गव्हाणे, नाशिक कॉलिंग
अंबड पोलिसांनी नवीन नाशिक परिसरात दोन विविध ठिकाणी सापळा रचून चार संशयितांना अटककरून त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह धारदार हत्यारे व एक मोटारसायकल हस्तगत केल्या.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि अंबड पोलीस ठाण्याचे सहय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे व पोलीस शिपाई प्रशांत नागरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाथर्डी फाटा परिसरात दोन संशयित व्यक्तींकडे गावठी कट्टा तसेच अन्य हत्यारे आहेत असे समजले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

त्यानुसार पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किशोर कोल्हे, पोलीस शिपाई प्रशांत नागरे, मुकेश गांगुर्डे, योगेश शिरसाठ, तुषार देसले, प्रविण राठोड, किरण सोनवणे, जनार्दन ढाकणे यांनी पाथर्डी फाटा परिसरात सापळा लावुन संशयित ललीत कल्याणराव गांगुर्डे (२९,रा. साई समृध्दी रोहाउस नं ०१, वावरेनगर, आय टी आय अंबड लिंक रोड नाशिक) ,प्रशांत विष्णु खतोडे (३४, रा. सायखिंडी ता. संगमनेर जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

त्यांच्याकडून १ गावठी कटटा, १ जिवंत काडतुस, १ मोटार सायकल व ०२ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, असा एकुण १ लाख ३० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास सपोनि किशोर कोल्हे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत (दि.२९) रोजी सव्वादोन वाजेच्या सुमारास उत्तमनगर, नवीन नाशिक येथे संशयित प्रणव बाबुराव हिरे (१९, रा. शिंपी समाज मंगल कार्यालयाजवळ, सोनवणे चाळ, दत्तचौक, नवीन नाशिक), रवि सुकदेव पांजगे (१९, रा. दत्त मंदिरसमोर, किरण अपा रूम नं २५, नाशिक) हे धारदार शस्त्र घेवुन फिरत असल्याबाबत पोलीस शिपाई राकेश राउत यांना माहिती मिळाली होती.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

उपनिरीक्षक सुनील बिडकर,अंमलदार मच्छिंद्र वाकचौरे,हेमंत आहेर, राकेश राउत, जनार्दन ढाकणे यांनी सापळा लावुन त्यांच्याकडून एक धारदार तलवार जप्त करून त्यांच्यावरही भारतीय हत्यार कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास हवालदार शेख करत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here