नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: गंगापुर रोडला मिनी क्रेन डोक्यात पडून १८ वर्षीय मुलाचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन आलेल्या मुलाच्या डोक्यात बांधकामावरील मिनी क्रेन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पुनित उत्तमराव मढावी (रा. नवश्या गणपती सेक्टर, मूळ रा. छत्तीसगड) यांचा मुलगा अरुण पुनित मढावी (वय 18) हा दि. 31 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील आर्चित गॅलॅक्सी कन्स्ट्रक्शन्सच्या साईटवर वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन आला होता.
त्यावेळी साईटचे कॉन्ट्रॅक्टर, सुपरवायझर, इंजिनिअर व बिल्डर हे बांधकामाच्या साईटवरील मिनी क्रेनमध्ये निष्काळजीपणे सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता वरच्या मजल्यावर नेत होते.
नाशिक: सोशल मीडियावर ओळख; धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दरम्यान, ही लोखंडी क्रेन खाली उभे असलेल्या अरुण मढावी या मुलाच्या डोक्यावर पडली.त्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी अर्चित गॅलॅक्सीचे कॉन्ट्रॅक्टर, सुपरवायझर, इंजिनिअर व बिल्डरविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
![]()


