नाशिक: कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून सुरु होता लग्न सोहळा; मनपाची कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): नवीन नाशिक भागात कोरोना नियम धाब्यावर बसवत सुरू असलेल्या लग्नसोहळ्यावर कारवाई करण्यात आली आहे,या कारवाईत वरपक्ष आणि वधूपक्ष यांच्या सोबतच उपस्थितांवरही दंडात्मक कार्यवाई करण्यात आली आहे..

प्रशासनाकडून मिळालेल्या माहिती नुसार कोव्हीड- १९ प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभाग व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत संयुक्तपणे नवीन नाशिक भागातील अश्विन नगर येथे कोणतीही परवानगी न घेता घरगुती विवाह समारंभ चालू होता. त्याचदरम्यान हा विवाह सोहळा सुरू असतांना सदर विवाहाच्या ठिकाणी मास्कचा वापर न केलेबाबत ३० नागरिकांना एकूण रु.१५०००,तसेच सोशल डिस्टन्स चे पालन न केलेबाबत वरपक्ष,  वधुपक्ष व केटरींग सर्व्हिसेसचे मालक यांचेवर  प्रत्येकी ५००० रुपये प्रमाणे एकूण १५,००० दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

अंबड पोलीस स्टेशनचे पीएसआय राकेश शेवाळे मनपाचे सिडको विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे ,अधीक्षक दशरथ भवर, स्वच्छता निरीक्षक बी आर बागुल ,राजेश बोरीसा,आदींकडून ही कार्यवाई करण्यात आली आहे..

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790