नाशिकमध्ये क्रूरतेचा कळस : ‘ती दयेची भीक मागत होती, तो सपासप वार करीत होता’

नाशिक (प्रतिनिधी): शहरात पाथर्डी परिसरात एका पेट्रोल पंप महिला कर्मचाऱ्यावर अज्ञात व्यक्तीकडून तलवारीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या पाथर्डी परिसरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे.

या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना नाशिकच्या पाथर्डी गावाजवळील वडनेर रोड येथील जाधव पेट्रोल पंपावर घडली आहे.

आज दुपारच्या सुमारास एक अज्ञात व्यक्तीने कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला करत पळ काढला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

हे ही वाचा:  RTO Nashik: रद्दी विक्रीसाठी 18 मार्च पर्यंत निविदा सादर करण्याचे आवाहन

दरम्यान हा धक्कादायक प्रकार पाथर्डी गावा शेजारील एका जाधव पेट्रोल पंप जाधव नामक पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या झाल्याने शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही महिला गेल्या अनेक दिवसांपासून या जाधव पेट्रोल पंपावर काम करत आहे. आज दुपारच्या सुमारास महिला कर्मचारी कार्यरत असताना अचानक अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने या महिलेवर सपासप वार केले. यावेळी तिने प्रतिकार करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र अज्ञात इसम वार करत होता. काही वेळानंतर त्याने पळ काढल्यानंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:  नाशिकचे कमाल तापमान ३८.७ अंशांवर; पुढील दोन दिवस कमाल तापमानात होणार वाढ !

घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. भर दिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. हल्ला करणारा संशयित हा महिलेचा ओळखीचा इसम असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तसेच गेल्या चार महिन्यापासून जखमी महिला पाथर्डी गावाजवळील जाधव पेट्रोल पंपावर काम करत होती. घोटी येथील प्रमोद गोसावी यांचे तिच्याशी दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गेले सहा सात महिन्यांपासून तिने प्रेमसंबंध तोडले होते. याचा राग संशयित आरोपी प्रमोद प्रकाश गोसावी याला आल्याने आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हल्ला केला.

हे ही वाचा:  नाशिक: गुंतवणूक करण्यास भाग पाडून दोघांची तब्बल सव्वा कोटीची फसवणूक

गेल्या चार महिन्यापासून जखमी महिला पाथर्डी गावाजवळील जाधव पेट्रोल पंपावर काम करत होती. घोटी येथील प्रमोद गोसावी यांचे तिच्याशी दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गेले सहा सात महिन्यांपासून तिने प्रेमसंबंध तोडले होते. याचा राग संशयित आरोपी प्रमोद प्रकाश गोसावी यास आल्याने आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हल्ला केला. या दोघांमध्ये जुना वाद असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संपूर्ण घटनेचा Video बघण्यासाठी इथे क्लिक करा…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790