नाशिकच्या मास्टर मॉलला लागलेली आग तब्बल ४८ तासांनंतर आटोक्यात…

नाशिकच्या मास्टर मॉलला लागलेली आग तब्बल ४८ तासांनंतर आटोक्यात…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या गंजमाळ येथील मास्टर मॉलला रविवारी लागलेली आग आटोक्यात आणण्यात तब्बल ४८ तासांनंतर यश आलं

अग्निशमन दलाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.

अग्निशमन दलासाठी अतिशय आव्हानात्मक असा हा “कॉल” होता….

आग आता आटोक्यात आलेली असली तरीही सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत…

गंजमाळ येथील मास्टर मॉलला रविवारी (ता. १९) सायंकाळी आग लागली. अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतरही दुसऱ्या दिवशी आगीचा भडका कायम होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10980,10978,10974″]

त्यामुळे संपूर्ण जुने नाशिक धूरमय झाले होते. मॉलला लागून असलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांमध्येही भीती कायम होती.

मॉलच्यावरील मजल्यात असलेल्या गोडाऊनमध्ये आग लागली होती. हा मॉल अडचणीच्या जागेत असून, त्यास आपत्कालीन दरवाजा, तसेच व्हेंटिलेशन नसल्याने आणि धुराचे लोट यामुळे आग विझविण्यात मोठी अडचण येत होती.

दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. आग विझविण्यात अडचण येत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवता येत नव्हतं. सलग दुसऱ्या दिवशीही आग सुरू होती. त्यामुळे रविवारपेक्षा सोमवारी धुराचे लोट अधिक प्रमाणात बाहेर पडत होते. दुपारी आगीचा भडका वाढल्यानंतर त्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा जम्बो क्रेनचा वापर करत पाण्याचा मारा केला. सलग २८ तास उलटूनही आग सुरूच असल्याने मॉलचे मालक आणि अग्निशमन विभागाचाही काहीसा धीर सुटत असल्याचे बघावयास मिळाले. आग आटोक्यात येत नसल्याने शेवटी मॉलचा पुढील भाग जम्बो पॉकलेन यंत्राने तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. बाहेरून रात्री उशिरा पॉकलेन घटनास्थळी दाखल होणार आहे. त्याच्या सहाय्याने पुढील भाग तोडल्यास सकाळपर्यंत आग आटोक्यात येण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी तसेच भद्रकाली पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 30 ऑक्टोबरला आयोजन

आगीची तीव्रता लक्षात घेता आग विझवण्यासाठी प्राथमिक स्तरात वापरण्यात येणाऱ्या डीसीपी बॉलचाही वापर करण्यात आला. घटना मोठी असल्याने तसेच २८ तासांपासून अग्निशमन विभागाचे आणि पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. घटना सोडून कार्यालयात जाणे शक्य नसल्याने घटनास्थळीच अन्य कर्मचाऱ्यांना बोलावून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना बदली करून रिलिफ देण्यात आली. इतर वेळेस पोलिस ठाण्यात तसेच कार्यालयात कर्मचारी बदली होत असतात.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790