धक्कादायक! अवघ्या 14 वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

धक्कादायक! अवघ्या 14 वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): वणी येथील कड गल्लीत राहणारे एस. टी. महामंडळाचे कर्मचारी प्रकाश गावित यांची दहावीत गेलेली मुलगी नेहा (१४) हिचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लोखंडी पाइपला दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू

सोमवारी (ता.२२) दुपारी साडे बाराच्या दरम्यान नेहाला उलटीचा त्रास झाला. उलट्या झाल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले, छातीमध्ये जास्त वेदना होऊ लागल्याने नातेवाईकांनी तातडीने जवळील खासगी रुग्णालयात आणले.

तेथील डॉक्टरांनी तपासले असता प्रकृती चिंताजनक वाटल्याने दुस-या खासगी रुग्णालयात पाठविले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता नेहा हिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिचा तीव्र हृदय विकाराचा झटका आल्याचे सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उधमाळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘डार्क स्काय डेस्टिनेशन’ विकसित होणार; खगोल पर्यटनाला चालना

नेहा ही वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. ती अभ्यासातही हुशार होती. नेहाच्या अकाली मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790