नाशिक (प्रतिनिधी) : दिंडोरीत वणी परिसरातील द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीच्या दिंडोरी पोलीस ठाण्यात चार तसेच वणी पोलिस ठाण्यात सात अशा ११ संशयित व्यापाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याप्रकारणात नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी प्राधान्य देऊन पाचही जिल्हा पोलीस अधीक्षकांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार मनोज दत्तात्रय गणोरे (रा.खडकसुकेणे) यांची ४ लाख ५५ हजार ७०० रुपयांची द्राक्षे खरेदी करून खोटे धनादेश देऊन फसवणूक केली. तसेच प्रशांत गणोरे यांची १ लाख ७४,०० रुपयांची द्राक्षे खरेदी करून पैसे न देता खोटे धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गोरक्षनाथ शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोककुमार तोलाराम रघुवंशी (रा.गुजरात) तसेच गोरक्षनाथ शिरसाठ यांच्या समवेत दोघा व्यापाऱ्यांविररोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.