नाशिक (प्रतिनिधी): इनोवा गाडीतून ऑइल पडत आहे, असे सांगून लक्ष विचलित करून गाडीतील एक लाख रुपये लंपास केल्याचा प्रकार नाशिकच्या एमजी रोड येथे घडला. शहरातील एम.जी.रोड परिसरात सोमवारी (दि.५ ऑक्टोबर) रोजी दोन अज्ञात इसमांनी एक लाख रुपये व महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली. यासंदर्भात सरकारवाडा पोलिस ठाण्यात रामचंद्र नामदेव जाधव (वय ६०,रा.सिताराम निवास बोधले नगर, नाशिक) यांनी फिर्याद नोंदवली आहे.
फिर्यादीनुसार रामचंद्र जाधव व त्यांचा पुतण्या एम.जी रोड येथे इनोवा गाडीमध्ये बसलेले असताना, दोन अज्ञात इसमांनी लक्ष विचलीत करण्यासाठी गाडीचे ऑइल खाली पडत असल्याचे सांगितले. संबंधितांनी तपासणी करण्यासाठी गाडीतून उतरून बोनेट उघडून पाहणी करत असताना. जाधव व त्यांच्या पुतण्याचे लक्ष नसताना १ लाख रुपये रक्कम ठेवलेली काळ्या रंगाची ब्रिफ केस व महत्त्वाची कागदपत्रे बेकायदेशीररीत्या चोरून नेली.