पाऊस नसला तरी नाशिक शहरात वीजेचा लपंडाव !

नाशिक(प्रतिनिधी): शहरात (दि.२ ऑक्टोबर) रोजी शुक्रवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यामुळे शहरातील काही भागांमध्ये वीजपुरठा खंडित करण्यात आला होता. पावसामुळे वीज पुरवठा खंडित करणे, ही बाब नेहमीचीच असली तरी आता पाऊस नसताना देखील वीज पुरवठा खंडित होत आहे.

शहरातील महात्मा नगर, सिडकोमधील काही भाग, अंबड, इंदिरानगर इत्यादी परिसरातील नागरिकांना नेहमीच वीज खंडित होते. त्याचप्रमाणे शहरातील इतर भागांमध्ये देखील नागरिकांना याच अनुभवातून जावे लागत आहे. उपनगर परिसरात देखील मध्यरात्री केव्हाही वीजपुरवठा बंद होतो. काही फेज बंद तर काही सुरू राहत असल्याचा प्रकार नेहमीचाच झाला आहे. याबाबत महावितरणाच्या अभियंत्यांना विचारपूस केली असता, त्यांच्याकडून काम सुरू असल्याचे किंवा थोड्यावेळात वीज येईल अशी कारणे देण्यात येतात. परंतु कुठे बिघाड झाला किंवा नेमके काय घडले, याबाबत कुठलीच माहिती दिली जात नाही. सिडको अंबड परिसर तसेच सातपूरच्या काही भागांमध्ये हीच अवस्था आहे. पंचवटीमधील हिरावाडी परिसर, दिंडोरीरोड परिसरामध्ये देखील खंडीत वीजपुरवठाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मीटर रिडींग, वीजबिल भरणा तसेच तक्रारी करणाऱ्या यंत्रणेचे खासगीकरण झाले असून, नागरिकांचा आणि स्थानिक अभियंत्यांचा आता फारसा संपर्क राहिलेला नाही. त्यामुळे लाईनमनचा  क्रमांक नागरिकांकडे सापडतो. परंतु, अधिकारी आणि अभियंत्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक नागरिकांना मिळवण्यासाठी कसरत करावी लागते.

हे ही वाचा:  नाशिक:  घरूनच टपाली मतदानाची 80 वर्षांवरील मतदारांना सुविधा !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790