त्र्यंबकेश्वर परिसरात गटारीच्या कडेला आढळले ३ महिन्याचे बाळ

नाशिक (प्रतिनिधी) : बाळ व्हावे म्हणून, अनेक दांपत्य मंदिराचे तसेच दवाखान्याचे उंबरठे झिजवतात. मात्र, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर परिसरात अज्ञात व्यक्तीने एका ३ महिन्याच्या बाळाला रस्त्यावर गटारीच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादयक घटना समोर आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४५०० बसचे नियोजन; भाविकांच्या सुरळीत प्रवासासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचा आराखडा

 मंगळवारी (दि.१२ जानेवारी) रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गाजवळ असलेल्या आधारतीर्थ आश्रम समोर एक हृदयद्रावक घटना घडली. दरम्यान, ३ महिन्याच्या बाळाला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले होते. हे बाळ जोर-जोरात रडत असून, बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून,आश्रमातील झोपलेली मुले जागी झाली. त्यांनी त्यांचा सांभाळ करणाऱ्या मावशींना उठवले. दरम्यान, सर्वांनी रडण्याच्या आवाजाच्या दिशेने बाहेर जाऊन पाहिले असता, रस्त्याच्या कडेला गटारीजवळ एक बाळ रडत असल्याचे दिसले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४५०० बसचे नियोजन; भाविकांच्या सुरळीत प्रवासासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचा आराखडा

त्यांनी तातडीने आश्रमातील अध्यक्षांना याची माहिती दिली. याबाबत पोलिसांना कळवले असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बाळ चिखलाने माखले होते, त्यामुळे बाळाला स्वच्छ करण्यात आले. सध्या बाळाला घारपुरे घाट येथील आधारआश्रमात ठेवण्यात आले आहे. तसेच पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790