डोळ्यांदेखत चोरी; ट्रायल घेण्यासाठी दुचाकी घेऊन गेला, तो परत आलाच नाही, नाशिकमधील घटना!

डोळ्यांदेखत चोरी; ट्रायल घेण्यासाठी दुचाकी घेऊन गेला, तो परत आलाच नाही, नाशिकमधील घटना

नाशिक (प्रतिनिधी): चोरी करण्यासाठी चोर काय काय फंडे वापरतील हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार नाशिक शहरात घडला आहे. दुचाकी घेण्यासाठी आलेल्या युवकाने ट्रायलसाठी दुचाकी घेतली.

मात्र त्यानंतर तो दुचाकी घेऊन परतलाच नाही. एक तास वाट पाहुनही तो युवक परत न आल्यामुळे संबंधित मालकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित तक्रारदारास दुचाकी विक्री चांगलीच महागात पडली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात शेतकऱ्याला मारहाण करत लूट

महाकाली चौकातील एका तरुणाला आपल्या दुचाकीचे फोटो विक्रीकरिता ऑनलाइन व सोशल मीडियावर टाकणे चांगलेच महागात पडले. दुचाकीची ट्रायल घेण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन संशयित फरार झाल्याची घटना घडली आहे.

प्रशांत जगताप यांनी दुचाकी (एमएच- १५- ईवाय- ४८१८) विकायची असल्याने त्यांनी फेसबुक आणि ओएलएक्सवर दुचाकीचे फोटो अपलोड केले. काही दिवसातच त्यांच्याकडे सात ते आठ व्यक्तींनी भेट घेऊन दुचाकी बघितली.

नाशिकमध्ये रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी; एक जखमी, पंचवटीत गुन्हा दाखल !

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

अनेक व्यक्तींनी स्वतः भेट घेऊन दुचाकी बघितली. मात्र बुधवारी अज्ञात व्यक्तीचा फोन प्रशांत जगताप यांना आला. ‘मला तुमची गाडी आवडली आहे. मला ती गाडी घ्यायची आहे. आपण कुठे भेटू शकतो, असे फोनवर दोघांचे बोलणे झाले. बोलणे झाल्यानंतर, जगताप यांनी समोरील संशयिताला शुभम पार्कजवळील भावसार ज्वेलर्स या ठिकाणी भेटण्यास सांगितले. दुपारी सुमारे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान जगताप आणि संशयित भेटले.  दोघांची चर्चा झाल्यानंतर, संशयिताने ट्रायल करता दुचाकी घेऊन गेला तो पुन्हा आलाच नाही.

👉 हे ही वाचा:  विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षण: नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

नाशिक: “तू मुलीला फोन का करतो” म्हणत युवकास बेदम मारहाण

ज्या नंबर वरून जगताप यांना फोन करण्यात आला होता, तो बंद होता. जगताप यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जगताप यांनी थेट अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. या वेळी ज्वेलर्स दुकानाजवळील माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांचे कार्यालय असून, त्या कार्यालयाच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790