घराच्या पडवीत लपून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

घराच्या पडवीत लपून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
इगतपुरीच्या सिद्धार्थ नगर येथे पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याने नारायण निकम यांच्या घरातील पडवीत प्रवेश केला होता.

रॅक पडण्याच्या आवाजने निकम हे बघण्यासाठी पडवीत गेले असता अवघ्या दोन ते तीन फुटाच्या अंतरावर असलेल्या बिबट्याने निकम यांच्यावर झडप घालत त्यांच्यावर हल्ला चढविला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराबाहेरच थांबणार; नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ७२ ठिकाणी वाहनतळांचे नियोजन

बेसावध असलेल्या निकम यांनी आरडा ओरड केल्याने बिबट्याने निकम यांना आपल्या तावडीतून सोडून तेथून धूम ठोकली.

या हल्ल्यात नारायण निकम हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या शरीराच्या विविध भागावर बिबट्याने हल्ला केल्याने जखमा झाल्या आहेत.. निकम यांचा पाय फॅक्चर असताना देखील त्यांनी बिबट्याला प्रतिकार करत आपला जीव वाचवला आहे. या घटनेने परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरून भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला होता, तर घरासमोर खेळत असलेल्या मुलावर बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत- अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9007,8998,8994″]

त्याच पाठोपाठ प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या आता थेट घरात घुसून माणसांवर हल्ला करत असल्याने इगतपुरी येथील नागरिक हे मोठ्या भीतीच्या सावटाखाली आहेत. वनविभागाने या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी येथील नागरिक करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790