खेळताना अंगणात पडल्याने बालकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): औरंगाबाद रोडवरील नांदूर नाका परिसरातील सहा वर्षाच्या बालकाचा राहत्या घराबाहेरील अंगणात खेळताना अचानकपणे पडल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झाला.

त्याला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यानच बालकाचा मृत्यू झाला. बालकाचे नाव मोहित सोमनाथ कुऱ्हाडे होते. खेळत असताना अचानक पाय घसरला व तो डोक्यावर पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणाची नोंद आडगाव पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मिशन ग्रीन मान्सून उपक्रमांसाठी सरसावले नाशिककर ! ३५०० नागरिकांना घरपोच रोपांचे वाटप
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790