आर्मीचा गणवेश घालून शिरला आर्टिलरी कॅम्पमध्ये; नाशिकमध्ये एकाला अटक
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.
नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे आर्टिलरी सेंटर आहे.
या परिसराला चारही बाजूने कडक बंदोबस्त तैनात असतो.
या परिसरात एक व्यक्ती आर्मीचा गणवेश घालून घुसला. लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात फिरणाऱ्या या तोतयाला अटक करण्यात आलंय. लष्करी हद्दीत फिरत असताना त्याच्या हालचालींवर संशय आला. गणेश बाळू पवार असं संबंधित व्यक्तीचं नाव आहे.
गणेशची झडती घेतली असता त्याच्याकडे लष्करी कॅन्टीन कार्ड मिळून आले तसेच त्याच्या गाडीवर लष्कराचा लोगो सुद्धा लावलेला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. यावेळी तो तोतया असल्याचं समोर आलं. देवळाली लष्कर कॅम्पच्या स्कूल ऑफ आर्टिलरीतील हा प्रकार आहे.
गणेश बाळू पवार हा याआधीही लष्कराच्या हद्दीत घुसला होता का, त्याचा छावणीत घुसण्याचा उद्देश काय होता, याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
महत्वाची बातमी: या १८ रेल्वे गाड्या मेगाब्लॉकमुळे तीन दिवस रद्द
चिंताजनक: पोर्तुगालहून नाशिकला आलेले दोघे कोरोनाबाधित