नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून महाविद्यालये बंद होती. मात्र आता कोरोनाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. अशातच ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचाही सूर विद्यार्थ्यांकडून येत होता. पण अखेर आता १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये पुन्हा सुरु होणार असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय.
गेल्या २३ मार्चपासून राज्यातील महाविद्यालये बंद आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ५ नोव्हेंबर २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार जागेची उपलब्धता पाहून, ५० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे. तसेच विद्यापीठांनी स्थानिक प्रधीकार्नांची सहमती घेऊनच महाविद्यालये सुरु करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.