हृदयद्रावक : पाटात वाहून आला एक वर्षीय बाळाचा मृतदेह!

नाशिक (प्रतिनिधी) : सिन्नर तालुक्यातील चांदगिरी गावात आदर्श विद्यालयाजवळ असलेल्या कडवा पाटात अंदाजे १ वर्षीय बाळाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली. बाळाचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्यामुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जातेय.

काल (दि.०२) दुपारच्या सुमारास पुरुष जातीचे मृत बाळ पाण्यात वाहून आल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी बाळाला पाण्यातून बाहेर काढले. या बाळाची ओळख अद्याप पटलेली नसून पुढील तपास सुरु आहे.

हे ही वाचा:  अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत: दादा भुसे

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790