सावधान.. शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवत नाशिकच्या व्यक्तीला ४ लाखांना गंडा
नाशिक (प्रतिनिधी): शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष देत ग्राहकाला चार लाख ६२ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी सायबर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि हेमंत सोनवणे (रा. हिरावाडी) यांच्या तक्रारीनुसार, संशयिताने मोबाइलवर ट्रेड २४ रिसर्च या कंपनीतून बोलत असल्याचे सांगत शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दिले. वेळोवेळी जेना स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यात रक्कम भरण्यास सांगत फसवणूक केली. याप्रकरणी निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: दुचाकीला झालेल्या अपघातात दोन सख्खे भाऊ ठार
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या मार्गांवर आता वाहनांना प्रवेश बंद !