नाशिकरोड: सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात घातला गोंधळ; पिता- पुत्राविरुद्ध गुन्हा

नाशिकरोड: सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात घातला गोंधळ; पिता- पुत्राविरुद्ध गुन्हा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोडच्या सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालय तथा न्यायदंडाधिकारी कक्षामध्ये गोंधळ घालून घोषणाबाजी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पिता- पुत्राविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग ४ तथा सहाय्यक दंडाधिकारी समीर शेख यांच्या कार्यालयात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांमधील चॅप्टर केस क्रमांक ३१३/ २०२१ मधील सामनेवाले अक्षय प्रकाश साळवे व इतर या प्रकरणात प्रतिबंधक कारवाईची सुनावणी सुरू असताना जेल रोड, मगर चाळ येथील शफीद्दीन कमृद्दिन काझी ( ५२) त्यांची मुले रफिक शफीद्दीन काझी (३०) व रिझवान शफीद्दीन काझी (२५) यांनी विनापरवानगी न्यायदान कक्षात प्रवेश करून कार्यकारी दंडाधिकारी यांच्या सुनावणीमध्ये अडथळा आणला.

हे ही वाचा:  नाशिक पोलीस आज घेणार ललित पाटीलचा ताबा; पथक मुंबईत दाखल

तेथील पोलिस कर्मचारी प्रकाश तुंगार यांनी काझी पिता- पुत्रांना न्यायदानाचे काम चालू असून बाहेर जाण्यास सांगितले असता, त्यांनी आरडाओरड करत शिवीगाळ व घोषणाबाजी करून त्यांना ढकलून दिले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी प्रकाश तुकाराम तुंगार यांच्या फिर्यादीवरून काझी पिता- पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला. नाशिक रोड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक एम. डी. परदेशी करीत आहे

हे ही वाचा:  नाशिक: एमडी ड्रग्जमाफिया ललित पाटीलसह ४ पेडलर्स नाशिक पोलिसांच्या ताब्यात !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790