नाशिकमध्ये रविवारी (दि. २२) नाशिक श्री २०२२ जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा !

श्रद्धा फाउंडेशन व रिफ्लेक्शन जिम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि २२) नाशिक श्री २०२२ स्पर्धा !

नाशिक (प्रतिनिधी): शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाची समजली जाणारी “नाशिक श्री” २०२२ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाची ही ४७वी नाशिक श्री स्पर्धा असून गोदा श्रद्धा फाउंडेशन व रिफ्लेक्शन जिम यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा व राज्य शरीरसौष्ठव असोसिएशन यांच्या मान्यतेने सदर स्पर्धा पार पडत आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: कर्जाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; एकाला अटक !

रविवार दि. २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रद्धा लॉन्स (हनुमान वाडी रोड) येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व विजेत्यांसाठी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांतदादा पाटील, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, संघटनमंत्री रवी अनासपुरे, शहर अध्यक्ष गिरीश पालवे हे उपस्थित राहणार आहेत.

⚡ हे ही वाचा:  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी पूर्ततेबाबत महत्वाची बातमी

या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य आयोजक सुरेश अण्णाजी पाटील, डॉ. अक्षय पाटील, राजेंद्र सातपूरकर व बॉडी बिल्डींग असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790