व्यावसायिकाकडून खंडणी मागणारी टोळी जेरबंद

नाशिक (प्रतिनिधी): किराणा दुकानदाराच्या घरात घुसून दुकान चालवण्यासाठी दर महिन्याला पाच हजारांची खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक करण्यात आले आहे. उपनगर पोलिसांनी ही कारवाई केली. अक्षय चावरिया, सूरज सूनासूना, तिलक विनोद सौदे ऊर्फ बित्या, ऋषिकेश चंद्रमोरे ऊर्फ खंड्या अशी या खंडणीखोर संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती व चंदरलाल बोधवणी (रा. उपनगर) यांच्या तक्रारीनुसार, उपनगर साई बाबा मार्केटमध्ये जनता जनरल अँड बेकरी स्टोअर्स आहे. रात्री दुकान बंद करून दुचाकीने घरी जात असताना संशयितांनी दगड मारून जखमी केले. दुसऱ्या दिवशी भाचा अमर वछाणी यांना घरात घुसून मारहाण केली. बोधवाणी यांच्याकडे दर महिन्याला पाच हजार हप्ता दिला तरच दुकान चालू देऊ नाहीतर दुकान कधीच चालू देणार नाही, अशी दमदाटी करून निघून गेले. या तक्रारीची दखल घेत पथकाने संशयितांना अटक केली.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790