विजेच्या धक्क्याने नाशिकरोडला १० वर्षीय लहानगीचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड भागातील सुंदर नगर येथे राहणारी सोनाली दिनकर निकुंभ (वय १०) या लहानगीचा आज विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला.
बॅडमिंटन खेळत असताना वायरला अडकलेले फुल काढताना तिला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यातच तिचा मृत्यू झाला.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बॅडमिंटन खेळत असताना बॅडमिंटनचे फुल खांबावरील वायरला अडकले.
हे फुल काढण्यासाठी तिने लोखंडी पाईप घेतला. याच प्रयत्नात तिला जोरदार विजेचा धक्का बसला. ही बाब लक्षात येताच नागरिकांसह तिच्या कुटुंबियांनी तातडीने धाव घेत तिला बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिसांनी नोंद केलीय. दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे निकुंभ कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसलाय.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
घराच्या पडवीत लपून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी
घोटीजवळ झालेल्या अपघातात तीन बालिकांसह एका तरुणाचा जागीच मृत्यू
नाशिकच्या एसटी कर्मचाऱ्यांनी केलं मुंडन आंदोलन