महत्वाचे: आज (दि. १ एप्रिल) रात्री १२ ते उद्या शनिवारी रात्री १२ पर्यंत नाशिकमधील पेट्रोलपंप बंद

महत्वाचे: आज (दि. १ एप्रिल) रात्री १२ ते उद्या शनिवारी रात्री १२ पर्यंत नाशिकमधील पेट्रोलपंप बंद

नाशिक (प्रतिनिधी): पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी नुकतेच गुढीपाडव्यापासून विनाहेल्मेट पेट्रोल दिले तर पंपचालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्याची घोषणा केल्यानंतर संतापलेल्या पेट्रो डीलर्स असोसिएशनने गुढीपाडव्याच्या दिवशी  नाशिक आयुक्तालय हद्दीतील सर्व सरकारी व खासगी कंपन्यांचे पेट्रोलपंप  बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे, असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली.

भुजबळ यांनी नववर्षाच्या स्वागताला असा बंद करू नका, असे आवाहन केले; मात्र, पेट्रो डीलर्स असोसिएशनने निर्णयावर ठाम रहात आज (दि. १ एप्रिल) रात्री १२ वाजेपासून उद्या, शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत पंप ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,

यामुळे शहरातील डिझेल, पेट्रोल, सीएनजी, ऑइल, एलपीजी याची विक्री बंद राहणार आहे.

बंदच्या काळात कुणालाही डिझेल किंवा इंधन पुरवठा केला जाणार नाही तसेच शहरात असलेले ऑइल कंपन्यांचे स्वतःचे आउटलेट तसेच पोलिसांच्या अखत्यारीतील दोन पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवांना इंधन पुरवतील.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कोकण व उत्तर महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा

आम्ही सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करू इच्छितो की आपण देखील या काळाच्या आधीच आपल्याला आवश्यक असणारे इंधन भरून घ्यावे म्हणजे इंधन विक्री बंद काळात आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचणीला तोंड द्यावे लागणार नाही असे आवाहन असोसिएशनने केले आहे.

गेले बरेच दिवस बायोडिझेल,  डिझेल पेट्रोलची दरवाढ,  सप्लायचा थोड्या फार प्रमाणात त्रास या आणि अशा अनेक विविध समस्यांचा पेट्रोलपंप चालक सामना करीत आहेत. नाशिक शहरात पोलिस आयुक्तांनी १५ ऑगस्ट रोजी ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिमेस प्रारंभ केला. नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशनने यात /सक्रिय सहभाग नोंदवला. त्याबद्दल पोलिस आयुक्त यांनी पेट्रोल डीलरचे कौतुकही केले, याकडे असोसिएशनने लक्ष वेधले.

तोपर्यंत नो हेल्मेट, नो पेट्रोलमोहीमेस सहकार्य नाही:
विनाहेल्मेट चालकास पेट्रोल दिल्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पंपचालकांवर दाखल करण्याचा तसेच विनाहेल्मेट दोनदा पेट्रोल दिल्याचे आढळल्यास त्या पंपाची एनओसी रद्द करण्याचा निर्णय अतिशय एकतर्फी व आमच्यावर अन्याय करणारा आहे त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांच्याकहे आम्ही गाऱ्हाणे मांडले. त्यांनीही पोलिस आयुक्त यांच्याशी याबाबत बोलण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आमच्या संघटनेच्या बैठकीत सर्वानुमते असा निर्णय घेतला की, जोपर्यंत १९ नोव्हेंबर २०२१ रोजी आम्ही पोलिस आयुक्तांकडे उच्च न्यायालयातील वकीलांद्वारे केलेल्या अर्जाची सुनावणी होऊन तिचा लेखी निर्णय येत नाही तोपर्यंत ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेस या महिन्यात कुठल्याही प्रकारचे सहकार्य करायचे नाही.

👉 हे ही वाचा:  नाशिक: गुजरातमधून नाशिकमध्ये तस्करी; साडेपाच लाखांचा गुटखा जप्त

पंपचालकांनी सामाजिक बांधिलकीही जोपासावी- पोलीस आयुक्तांची भूमिका
पेट्रोलपंप चालकांनी केवळ व्यवसायातून पैसे कमविण्याचा हेतू न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या ग्राहकाचे प्राण वाचले पाहिजे यासाठीदेखील सामाजिकता जोपासली पाहिजे. यासाठीच आपण कायद्याचा आधार घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याची भूमिका पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्पष्ट केली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: एम.डी. ड्रग्ज विक्री प्रकरणी दोघांना अटक; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई !

[wpna_related_articles title=”Other Important News” ids=”10311,10306,10304″]

नाशिक शहरात दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान करूनच वाहन चालवावे. त्यामुळे दुचाकीचालकांचेच प्राण सुरक्षित राहतील, अशी पोलिसांची या मोहिमेमागे भूमिका आहे. मात्र, पेट्रोलपंप चालक पोलिसांच्या अभियानाला सहकार्यच करीत नसल्याचा आरोप पांडे यांनी केला. यापूर्वीही आपण ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ हे अभियान राबविले. याला नाशिकरांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, मध्येच पोलिस बंदोबस्त पंपावरून काढून घेतल्यावर पुन्हा जैसे थे दिसून आले.

असे असले तरी हेल्मेटसक्तीची मोहिम आम्ही येत्या २ तारखेपासून गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा हाती घेत आहोत. विनाहेल्मेट वाहन चालविणे म्हणजे रस्त्यावर जाऊन अपघात करणे होय, हे एक प्रकारे आत्महत्या करण्यासारखेच आहे. अपघातात बस, ट्रक असो की अवजड वाहनाखाली दुचाकीचालक गेल्यास त्याच प्राण कसे वाचतील? आणि त्याने हेल्मेट न घातल्यास त्याला पेट्रोल न मिळाल्यास तो वाहनच चालवू शकणार नाही, हे देखील पंपचालक, मालकांनी लक्षात घेतले पाहिजे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790