पोलिस प्रशासनाकडून नाकेबंदीसाठी ४८ पॉइंट….

नाशिक (प्रतिनिधी): नवंवर्षाचे स्वागत लोकांकडून एकदम जोरदार पद्धतीने करण्यात आले.पोलिस यंत्रणेनेदेखील जय्यत तयारी केली होती. शहर व परिसरात प्रभावी नाकेबंदी करण्यात आली होती.जवळजवळ ४८ ठिकाणी नाकेबंदी पॉइंट्स लावण्यात आले होते.

रात्रीच्या संचारबंदी काळात नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक व  मद्यपींवर कडक कारवाई करण्यात आली आहे. मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांवर ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. यावर्षी कोरोनाचे मोठे संकट सगळ्यांसमोर असल्याने ते रोखण्यासाठी ही सारी खबरदारी प्रशासनाकडून घेतली गेली होती.परंतु,लोकांनी या गोष्टीचे गांभीर्य न ठेवता शासन आदेशाचे उल्लंघन केले आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील २८०० पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790