नाशिक शहरातील ‘या’ वसतीगृहातील १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
नाशिक शहरातील पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.
नाशिक शहरातील पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील एकूण ५२ विद्यार्थिनींचे शनिवारी स्वॅब घेण्यात आले होते.
त्यापैकी एकूण १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. या विद्यार्थिनींना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले असून सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालय इमारतही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आली आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: १५ ते १८ वयोगटातील मुलांना उद्या (दि. ३ जानेवारी) या ६ केंद्रांवर मिळणार लस
धक्कादायक: नाशिकला घराच्या टेरेसवरून उडी मारत विवाहितेची आत्महत्या…
दुर्दैवी घटना: गेला होता दोघांचे भांडण सोडवायला, अन् स्वत:चाच जीव गमावून बसला
नाशिक: गर्दी केली म्हणून या हॉटेल्स, वाईन शॉपला दीड लाखांचा दंड