नाशिक शहरातील या मार्गावर आजपासून (दि. २० जानेवारी) एकेरी वाहतूक
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात स्मार्टसिटी अंतर्गत पाईपलाइन व रस्त्याच्या कामासाठी त्र्यंबकनाका ते गंजमाळ सिग्नल या मार्गावरील वाहतूक गुरुवार (दि. २०)पासून एकेरी करण्यात येणार आहे.
साधारणत: ६७ दिवस हा बदल असणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या गंजमाळ सिग्नल ते त्र्यंबकनाका या मार्गावरुन रोजच मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र स्मार्ट सिटी अंतर्गत या परिसरात पाईपलाइनसाठी खोदकाम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाच्या ठिकाणी स्मार्ट सिटीकडून बॅरीकेंटीग करुन रात्रीच्या वेळी वाहनधारकांना दिसेल असे एकरी मार्ग, प्रवेश बंद, नो पार्किंगचे रेडीयम बोर्ड आदी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच वाहतूक कोंडी सोडण्यासाठी वाहतूक पोलिस, वार्डनची देखील नेमणूक करण्यात येणार आहे.
या पर्यायी मार्गाचा करावा वापर: त्र्यंबकनाका सिग्नल-गडकरी सिग्नल-एनडी पटेल राेडने- अण्णाभाऊ साठे चाैक तसेच इतर पर्यायी मार्गंाचा वापर करावा. तसेच या रस्त्यांच्या दाेन्ही बाजुस काम पूर्ण हाेईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नाे -पार्किंग झाेन आहे.