नाशिक: व्हिसलमॅन चंद्रकिशोर पाटील यांना ‘एनसीएफ’चा आउटस्टँडींग सिटीझन पुरस्कार!

नाशिक (प्रतिनिधी) कुठलेही संस्थात्मक अथवा शासकीय पाठबळ नसताना पर्यावरण रक्षणाच्या तीव्र कळकळीतून शहरातील नंदीनी नदीच्या प्रदुषणाविरोधात एकाकी लढा देणारे चंद्रकिशोर पाटील हे ‘नाशिक सिटीझन्स फोरम’च्या आउटस्टँडीग सिटीझन ऑफ नाशिक या पुरस्काराचे फेब्रुवारी महिन्याचे मानकरी ठरले आहेत.

नवरात्रीदरम्यान जमा होणारे शेकडो टन निर्माल्य नंदीनी नदीत फेकले जाऊ नये म्हणून दसऱ्याच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत उंटवाडी पूलावर शिट्टी घेऊन उभे राहत जनजागृती करण्याचा शिरस्ता गेल्या सहा वर्षांपासून पाळत आहेत. म्हणूनच ते ‘व्हीसलमॅन’ म्हणूनही ओळखले जातात.

आपल्या सभोवतालात आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, नाशिकच्या उन्नती आणि उत्थानासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या कामाला दाद देण्यासाठी दर महिन्याला ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ हा पुरस्कार देण्याचा निर्णय  ‘नाशिक सिटीझन्स फोरम’ने घेतला आहे.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

हे ही वाचा:  नाशिक: देखावे बघण्यासाठी गर्दीच्या शक्यतेने 'या' भागातील वाहतूक मार्गात बदल !

नवरात्रीतील पूजाअर्चनेमुळे घरात मोठ्या प्रमाणावर जमा झालेले निर्माल्य आणि घट दसऱ्यांच्या दिवशी लोक नदीत विसर्जीत करतात. त्यामुळे नदीची होणारी दूरवस्था पाहून अस्वस्थ झालेले पाटील नंदीनी नदीवरील उंटवाडी पूलावर दसऱ्याला दिवसभर शिटी घेऊन उभे राहू लागले.

कुणी नदीत निर्माल्य टाकू लागले की पाटील शिटी मारून त्याचे लक्ष वेधून घेतात आणि नदीचे प्रदुषण करण्यापासून परावृत्त करण्यासाठी संवाद साधतात. त्यात ते नदीची दूरवस्था, तेथील प्रदुषण दाखवून लोकांचे मन वळवतात. तरीही कुणी ऐकलेच नाही, तर नदीतील प्रदुषीत पाणी बाटलीत भरून त्या व्यक्तीला ते प्राशन करण्याची विनंती करून त्याला प्रदुषणाचा मुद्दा पटवून देतात.

हे ही वाचा:  डोक्याला पिस्तुल लावून 60 लाखांच्या खंडणीची मागणी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

त्यांच्या या उपक्रमाला हळूहळू चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि शेकडो टन निर्माल्य नदीत जाण्याऐवजी पूलाच्या काठावर ते जमा होऊ लागले. सातत्याने पाच वर्षे हा उपक्रम सुरू असताना २०२० साली इंडियन फॉरेस्ट ऑफिसर श्वेता बड्डू यांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. श्वेता यांनी त्याबाबत केलेल्या ट्वीटमुळे पाटील यांच्याकडे देशभरातील लोकांचे लक्ष वेधले गेले. देशभरातील वृत्तपत्र, रेडीओ, टीव्ही अशा विविध माध्यमांतून पाटील यांची दखल घेतली गेली. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’च्या आणि राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या सोशल मिडीया हँडलवरही पाटील यांच्या प्रयत्नांना दाद दिलेली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: फ्लॅट घेण्यासाठी २० लाख रुपये आणत नसल्याने विवाहितेचा छळ

नंदीनी नदीला प्रदुषणमुक्त करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठीही पाटील सातत्याने प्रयत्नशील आहेत. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ते अनेकदा नंदीनी नदीपात्रात स्वच्छतेसाठी उतरलेले दिसतात. संक्रातीच्यावेळी फलक आणि शिल्पकृतींच्या माध्यमातून ‘नो नॉयलॉन मांजा’ ही जनजागृती मोहिमही ते दोन वर्षांपासून राबवित आहेत. गजानन महाराज प्रकट दिनाच्या औचित्यानेही पाटील हे पर्यावरण जनजागृती करणारे देखावे सादर करत असतात. यंदा विनाशाकडे नेणारा विकास कि शाश्वत विकास या संकल्पनेवर त्यांनी लहानग्यांच्या मदतीने अनोखा देखावा सादर केला होता. 

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790