नाशिक: लग्न मोडल्याचा संशय अन तरुणीने कुटुंबीयांच्या मदतीने प्रियकराला जिवंत जाळले

नाशिक: लग्न मोडल्याचा संशय अन तरुणीने कुटुंबीयांच्या मदतीने प्रियकराला जिवंत जाळले

नाशिक (प्रतिनिधी): आई-वडिलांनी निश्चित केलेल्या मुलाशी लग्न मोडण्याच्या कारणावरून तरुणीने कुटुंबीयांच्या मदतीने पेट्रोल ओतून प्रियकराला जाळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ११) देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे घडली आहे.

या घटनेत तरुण ५५ टक्के भाजला असून त्याच्यावर देवळा येथे प्राथमिक उपचार करून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

शुक्रवार (ता.११) रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली. यामुळे तालुकाभरात खळबळीचे वातावरण आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहोणेर येथील प्लंबिंग व्यवसाय करणारा युवक गोरख काशिनाथ बच्छाव (वय ३१) याची रावळगाव ता. मालेगाव येथील युवती कल्याणी गोकुळ सोनवणे (वय २३) हिच्याशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली व नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने गोरखकडून तिला लग्नाची मागणी होवू लागली. मात्र या प्रकारास कल्याणीच्या कुटूंबियांकडून विरोध असल्याने यातून वाद निर्माण होऊ लागले.

दरम्यान सदर युवतीचे लग्न इतर ठिकाणी जमत असले तरी हे लग्न गोरखच मोडत असल्याचा मुलीच्या कुटुंबियांचा संशय बळावत गेला. आज दुपारी साडेअकराच्या सुमारास सोनवणे कुटूंबीय लोहोणेर येथे आले मात्र झालेल्या चर्चेत योग्य तोडगा न निघाल्याने वाद वाढला. त्याचे पर्यावसान म्हणजे सोनवणे कुटूंबीयाकडून गोरख यास लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली.

गोरख हा स्वतःच्या बचावासाठी येथील एका दुकानात घुसला असता त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून कल्याणी हिने माचीसची जळती काडी फेकल्याने गोरख पन्नास टक्के भाजला. त्यास तातडीने उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकारची देवळा पोलिसांनी तातडीने दखल घेत कल्याणी गोरख सोनवणे ( वय २३ ), गोकुळ तोंगल सोनवणे (वय ५७ ), निर्मला गोकुळ सोनवणे( वय ५२), हेमंत गोकुळ सोनवणे ( वय ३०) व प्रसाद गोकुळ सोनवणे (वय १८) सर्व राहणार बी.सेक्शन, रावळगाव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी माधुरी कांगने व उपविभागिय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक दिलिप लांडगे व सहकारी पुढील तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790