नाशिक: मुख्याध्यापक मेहूण्याकडून डोक्यात हातोडा मारून शालकाचा खून

नाशिक: मुख्याध्यापक मेहूण्याकडून डोक्यात हातोडा मारून शालकाचा खून

नाशिक (प्रतिनिधी): दारु पिऊन सासू सासऱ्यांना मारहाण करणाऱ्या शालकाला समजावून सांगण्यास गेलेल्या मुख्याध्यापक मेहूण्याने लोखंडी हातोडीने त्याच्या डोक्यात वार केल्याने शालकाचा मृत्यू झाल्याची घटना नांदगाव येथे घडली.

वाल्मीक साहेबराव ठाकूर (वय ३५) असे मृताचे नाव आहे. या घटनेने शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून संशयित मुख्याध्यापक ईश्‍वर ठाकूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापारेषणच्या प्रकल्पांना गती

शहरातील आनंदवाडी भागात वाल्मीक साहेबराव ठाकुर (पवार) या युवकाची मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमाराला लोखंडी हातोडीने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली. मयत वाल्मीक हा दारू पिऊन नेहमी आपल्या आई वडिलांना त्रास देत असे.

कैलासनगर येथे राहणारे मुख्याध्यापक ईश्वर देवराम ठाकूर (वय ४६) यांना याबाबत सासू सासरे यांनी कळविले असता या गोष्टीचा राग आल्याने ईश्‍वर ठाकूर यांनी शालकास मारहाणीचा जाब विचारला यात त्यांना राग अनावर झाल्याने त्यांनी वाल्मीक याच्या डोक्यात लोखंडी हातोडीने वार केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापारेषणच्या प्रकल्पांना गती

यात वर्मी वार डोक्यास लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि वाल्मीक यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच प्रदीप निवृत्ती ठाकूर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. नंतर श्‍वानास पाचारण करण्यात आले.

यावेळी मृतदेहाजवळ रक्ताने माखलेल्या हातोडीवरून श्‍वानाने संशयित ईश्वर देवराम ठाकूर यांच्याकडे रोख धरला. यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सुरवातीला खूनास नकार देणाऱ्या संशयित यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790