नाशिक: भरधाव कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

नाशिक: भरधाव कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

नाशिक (प्रतिनिधी): समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू होऊन आठवडा उलटत नाही तोच या महामार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात घडू लागले आहेत.

शनिवारी मध्यरात्री सिन्नर तालुक्यातील वावी जवळ शिर्डीच्या दिशेने जाणारी ब्रिजा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात कारमधील दोघे मृत्युमुखी पडले. तर दोघांचे प्रकृती चिंताजनक आहे.

समृद्धी महामार्गावर मलढोण ते दूसंगवाडी या गावांच्या दरम्यान शनिवारी मध्यरात्री शिर्डीच्या दिशेने जाणारी ब्रिजा कार क्रमांक एम. एच. 20 / ई. वाय. 5257 टायर फुटल्याने अपघातग्रस्त झाली.

शिर्डी च्या दिशेने जाणारी मार्गिका ओलांडून तीन ते चार पलटी भेट कार थेट मुंबई च्या दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवर जाऊन पडली. या अपघातात धरमसिंग गुसींगे, राजेंद्र राजपूत या दोघांचा गंभीर जखमी झाल्याने अपघातस्थळीच मृत्यू झाला.

तर भरतसिंग परदेशी, नंदीणी (पुर्ण नाव समजून आले नाही) हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती समजल्यावर शिर्डी व गोंदे येथील इंटरचेंज वरील मदत पथके, वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी, महामार्ग सुरक्षा पोलीस पथकातील कर्मचारी अपघात स्थळी जाऊन आले रुग्णवाहिकेतून मृतदेह व जखमींना सिन्नर येथील रुग्णालयात नेण्यात आले.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790