नाशिक: बॅनर लावताना पडल्याने युवकाचा मृत्यु

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नाका परिसरातील नवजीवन इमारतीवर बॅनर लावत असताना पाय घसरून पडल्याने २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यु झाला.

अजय पंढरीनाथ पवार (२५, रा. आयटीआय सिग्नलजवळ, सातपूर) असे मयत युवकाचे नाव आहे.
गेल्या बुधवारी (ता १४) दुपारी चार वाजेच्या सुमारास अजय हा नवजीवन बिल्डिंगवर होर्डिंग बॅनर लावत होता. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला.

हे ही वाचा:  नाशिक: रंगपंचमीला पावसाचा अंदाज; तापमानात दोन अंश घसरण

यात अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याच्या कानातून रक्त येऊ लागले. उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता, गुरुवारी (ता. १५) दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

हे ही वाचा:  घटस्फोट झालेल्या पतीकडूनच पत्नीचा विनयभंग, घटनेनंतर संशयिताचे पलायन

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790