नाशिक: बहिणीच्या लग्नाच्या 2 दिवस आधीच भावाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक: बहिणीच्या लग्नाच्या 2 दिवस आधीच भावाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): बहिणीच्या लग्नाच्या दोन दिवस आधीच भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दोन दिवसावर बहिणीचे लग्न येऊन ठेपले असताना, सर्व घरात लग्न सोहळ्याचे आयोजन करीत असतानाच अचानक झालेल्या दुर्घटनेत एकुलत्या एक भावाच्या मृत्यूने संपूर्ण दातली गावात (ता. सिन्नर) शोककळा पसरली.

घटनेचे सविस्तर वृत्त असे की शुक्रवार दि.२० रोजी दुपारी शेतात रोटावेटर मारून घरी परतत असताना चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या सहा फूट खोल चारीत कोसळला आणि पलटी झाला.

यात चालकाच्या बाजूला बसलेला ओमकार चिंतामण चांदोरे(वय १८) याचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाला.

बहिणीचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना एकुलत्या एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात तसेच कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मयत ओमकार चांदोरे याच्यावर सायंकाळी सहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस नाईक विनोद इप्पर, सचिन काकड करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790