नाशिक: प्लास्टिकचे पिस्तूल दाखवत लुटले महिला वकिलाचे मंगळसूत्र; संशयित ताब्यात

nashik calling

नाशिक: प्लास्टिकचे पिस्तूल दाखवत लुटले महिला वकिलाचे मंगळसूत्र; संशयित ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): वकील महिला बाळाला दूध पाजत असताना दोन संशयितांनी प्लास्टिकची बंदूक दाखवत तिच्या गळ्यातील ४६ हजारांचे मंगळसूत्र आणि नेकलेस लुटून नेला.

मखमलाबादरोडवरील एका मंगल कार्यालयात हा प्रकार घडला.

याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार संशयित संदीप लक्ष्मण पाटील आणि त्याच्या अनोळखी साथीदारावर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: डेंग्यू उत्पत्ती; रेल्वे स्टेशनसह १०५८ आस्थापनांना नोटिसा

पोलिसांनी दिलेली माहिती आणि अॅड. पूजा भडांगे (रा. संगमनेर) यांच्या तक्रारीनुसार, मखमलाबाद रोडवरील एका मंगल कार्यालयात लग्न समारंभासाठी आल्या होत्या.

हॉलमधील एक रूममध्ये बाळाला दूध पाजत असताना संशयित संदीप पाटील व त्याचा एक साथीदार रूममध्ये आला. प्लास्टिकचे पिस्तूल रोखत भडांगे यांच्या गळ्यातील ४६ हजारांचे नेकलेस व मंगळसूत्र खेचून नेले. हा प्रकार लक्षात आल्याने हाॅलमधील नागरिकांनी तत्काळ संशयिताला पकडले. पंचवटी पोलिसांना कळवले. पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. साथीदार मात्र गर्दीचा फायदा घेत फरार झाला.

हे ही वाचा:  नाशिक पोलीस आज घेणार ललित पाटीलचा ताबा; पथक मुंबईत दाखल

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790