नाशिक: पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घाला

नाशिक: पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घाला

नाशिक (प्रतिनिधी): पत्नीला आण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातला

महामार्गावर गॅसटँकरने दिलेल्या धडकेत हा तरुण जागीच ठार झाला.

मनमाड चांदवड महामार्गावरील दुगावजवळ गॅसटँकर आणि दुचाकीची धडक झाली.

या धडकेत नांदगाव येथील संदीप दिनकर शिंदे (वय 27) हा युवक जागीच ठार झाला.

नांदगाव येथून वडनेर भैरव येथे आपल्या पत्नीला घरी आणण्यासाठी निघालेले संदीप यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या गॅस टँकरने जोरदार धडक दिली. या धडकेने संदीप उधळून ट्रकच्या चाकाखाली गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत संदीप शिंदे हा नांदगाव बसस्थानकाजवळ येथे वास्तव्यास होता. त्याला आठ महिन्याची लहान मुलगी असून पत्नी, भाऊ, दोन बहिणी, आई, वडील असा परिवार आहे. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना आपल्या भावासह मजुरीचं काम करत होता. घरातील कर्ता मुलगा गेल्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध

17 मार्च रोजी नाशिक चांदवड महामार्गावरील सोग्रस फाट्याजवळ अपघातात नांदगाव येथील युवक आकाश हिरे याला अपघातामुळे आपला जीव गमवावा लागला. तीनच दिवसात नांदगाव येथील दोन युवकांना अपघातात जीव गमवावा लागल्याने नांदगावकरांवर शोककळा पसरली आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790