नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: दुचाकी पार्किंगच्या वादावरून एकास बेदम मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): महामार्ग बसस्थानक परिसरात दुचाकी पार्क करण्याच्या वादातून टोळक्याने एकास बेदम मारहाण करण्यात आली आहे.
या घटनेत सदर व्यक्ती जखमी झाला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सफिल उर्फ पुठ्ठा, महिंद्रा भानी चंद, यासिन फारूख शहा व ललित भक्त बहादूर बलायर (रा.सर्व सातपूर) अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत.
नाशिक: घरातील लाईट दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यास बेदम मारहाण
याप्रकरणी गजेंद्रकुमार समेधन मिश्रा (४२ रा.जाचकमळा,जयभवानीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शनिवारी (दि.२५) रात्री ही घटना घडली. पल्सर (एमएच १५ एचएल ७४७९) दुचाकीवर आलेल्या सफिल उर्फ पुठ्ठा याने सुरक्षा रक्षक कॅबीन भागात आपली दुचाकी पार्क केली. यावेळी मिश्रा यांनी त्यास विरोध करून दुचाकी पार्किंगमध्ये लावण्यास सांगितल्याने हा वाद झाला. संशयित व त्याचा साथीदार महिंद्रा भानीचंद यांनी कोयत्याचा धाक दाखवित मिश्रा यांना शिवीगाळ केली. तर उर्वरीत दोघांनी चामडी पट्टयाने व लाथाबुक्यांनी त्यांना मारहाण केली. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.