नाशिक: दगडाचा धाक दाखवून ६० वर्षीय वृद्ध अपंग महिलेवर २४ वर्षीय तरुणाकडून अत्याचार

नाशिक: ६० वर्षीय वृद्ध अपंग महिलेवर २४ वर्षीय तरुणाकडून अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी): अपंग वृद्ध ६० वर्षीय महिलेवर दगडाचा धाक दाखवून एका २३ वर्षीय तरुणाने अत्याच्यार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत समोर आला आहे.

या घटनेने शहर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

शहरात आता वयोवृद्ध महिला देखील सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

उपनगर येथील जेतवन नगर भागात एक ६० वर्षीय वृद्ध महिला ही एकटी राहते. याचा गैरफायदा घेत एका २४ वर्षीय तरुणाने वृद्ध महिलेच्या घरात घुसत पीडित वृद्ध महिलेला दगडाचा धाक दाखवून रात्रभर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. साहिल आवारे (वय २३) असे संशयिताचे नाव असून उपनगर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने शहर परिसरात एकच संताप व्यक्त केला जात असून, आता शहरात वृद्ध महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790