नाशिक: थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार सातपूरला घडला आहे.
महापालिकेच्या सातपुर विभागीय कार्यालयातील पाणीपट्टी व घरपट्टी विभागाचे कर्मचारी प्रदिप खोडे हे थकबाकी वसुलीसाठी गेले होते.
त्यावेळी सातपूर कॉलनी सम्यक चौक येथिल अक्षय देसाई नामक व्यक्तीकडे थकबाकी भरण्याची विनंती केली असता त्या व्यक्तीने खोडे यांना लाथा बुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे.
या मारहाणीमुळे खोडे यांच्या डोळ्यास आणि पोटात मुका मार लागल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कळताच दोषी वर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणी साठी सातपूर विभागीय कार्यालय येथे काम बंद आंदोलन करण्यात आले होते. या घटनेचा कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनपा कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले थांबणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
विनाहेल्मेट दुचाकीचालकांची होणार १२ ठिकाणी वाहतूक नियमांची परीक्षा