नाशिक: डिव्हायडरवर कार आदळून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): डिव्हायडरवर कार आदळून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक्माद्ये घडली आहे.
शहरातील इंदिरानगर मधील विनय नगर पोलीस चौकी समोर हा अपघात झाला आहे.
चालकाचे नाव दर्शन मोतीलाल जैन असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मयत दर्शन मोतीलाल जैन वय 21 वर्ष हे विनय नगर मधील अभिषेक अपार्टमेंट मध्ये राहत होते. शनिवारी सायंकाळी काही कामानिमित्त त्यांच्या जवळील मारुती झेन (MH02 BD-4607) या गाडीने ते निघाले. विनय नगर कडून इंदिरानगरकडे ते जात होते. गाडीचा स्पीड जास्त असल्याने दर्शन यांची कार विनय नगर पोलीस चौकी समोर असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली. यात दर्शन जैन हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या हातापायाला तसेच पोटाला मार लागला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई नाका पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटना स्थळी दाखल झाले. यानंतर अपघाताचा पंचनामा करून सदर प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.