नाशिक: चोर असल्याची अफवा; रस्ता चुकलेल्या दाम्पत्याला बेदम मारहाण; पतीला चाकू खुपसला

नाशिक: चोर असल्याची अफवा; रस्ता चुकलेल्या दाम्पत्याला बेदम मारहाण; पतीला चाकू खुपसला

नाशिक (प्रतिनिधी): परिसरात चोर आल्याची अफवा शहरात मजुरी करण्यासाठी आलेल्या बिहार येथील दांपत्याच्या जीवावर बेतली.

परिसरातील नागरिकांनी चोर समजून या दांपत्याला बेदम मारहाण करत पोटात चाकू खुपसत गंभीर जखमी केले.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

विहितगाव येथील हांडोरे मळा येथे मॉब लिचिंगचा हा प्रकार घडला.

हे ही वाचा:  उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते होणार राज्यातील 434 आयटीआय मध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन !

याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि विजय हांडोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अजय सिंग आणि त्यांची पत्नी कल्पना सिंग हे दांपत्य बांधकाम साईटवर मजुरी करुन रात्री घरी जात असताना जमावाने अजय सिंग यांना बेदम मारहाण केली. पत्नीलाही धक्काबुक्की केली. यातील एका संशयिताने चाकू काढून सिंग याच्या पोटात खुपसला. सिंग रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर जमावाने पलायन केले.

हे ही वाचा:  नाशिक: मदतीचा बनाव करत वृद्धेची पोत अन् रोकड चोरट्याने लांबवली

याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेतली असता परिसरात काही दिवसांपासून एक महिला दार ठोठावते आणि तिचे साथीदार घरात घुसून चोरी करतात अशी अफवा पसरली आहे. सिंग दांपत्य नुकतेच या परिसरात राहण्यास आले आहे. रात्रीच्या वेळी हे दांपत्य रस्ता चुकले. त्यांनी चुकून एका घराची कडी वाजवली. परिसरातील नागरिकांना हेच चोर आहेत, असे वाटल्याने त्यांनी आरडाओरड करत दामपत्यांला पकडून बेदम मारहाण केली. यामध्ये सिंग गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निरिक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790