नाशिक: गरबा सुरु असतांना इलेक्ट्रिक शॉक लागून डीजे ऑपरेटरचा मृत्यू

नाशिक: गरबा सुरु असतांना इलेक्ट्रिक शॉक लागून डीजे ऑपरेटरचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील उपनगर परिसरात गरबा खेळत असताना वाद झाल्याने एका खून करण्यात आला असल्याची घटना ताजी असतानाच आडगाव परिसरामध्ये इलेक्ट्रिक शॉक लागून एका डीजे ऑपरेटरचा मृत्यू  झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे..

🔎 हे वाचलं का?:  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे नाशिक येथे 16 एप्रिल रोजी आयोजन

पप्पू बेंडकुळे असे डीजे ऑपरेटरचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात नवरात्र निमित्त अनेक ठिकाणी  गरबा खेळला जातो. याही वर्षी मोठ्या प्रमाणात शहरात गरबा रंगला होता.

शहरातील आडगाव परिसरात सुद्धा गरब्याचे आयोजन केलं होतं. या ठिकाणी पप्पू बेडकुळे यांचा डीजे लावला होता. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

🔎 हे वाचलं का?:  गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

ऐन गरबा रंगात आल्यानंतर डीजे बंद पडला होता. डीजे बंद पडला तेव्हा जोरात आवाज होऊन स्पर्किंग झाल्याचं नागरिक सांगत होते.  डीजेजवळ बसलेले डीजे ऑपरेटर पप्पू बेडकुळे हे बेशुद्ध पडले होते. त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.  दसऱ्याच्या पूर्व संध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790