Live Updates: Operation Sindoor

नाशिक: गंगापूर धरणाजवळ Ertiga पलटी होऊन अपघात; १ युवती ठार ६ जखमी

नाशिक: गंगापूर धरणाजवळ Ertiga पलटी होऊन अपघात; १ युवती ठार ६ जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील गंगापूर धरणा जवळली गंमत जंमत हॉटेलजवळ झालेल्या अपघातात एक तरुणीचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत.

या सहाही जणांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.

भरधाव मालट्रकने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाला असल्याच म्हटलं जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी (3 ऑगस्ट) Ertiga कारने (MH15/EX0949) सात जण प्रवास करत होते.

👉 हे ही वाचा:  यंदा मान्सूनचे लवकर आगमन – १३ मेपूर्वी अंदमानात प्रवेश, महाराष्ट्रातही लवकर हजेरीची शक्यता

यात तीन मुली आणि चार मुल होते. गंगापूर गावातून गिरणारे गावाकडे जात होते. समोरून भरधाव वेगात आलेल्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्यान हा अपघात झाला. या अपघातात सर्व सात जण जखमी झाले होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: अल्पवयीन मुलांना हाताशी धरून चेनस्नॅचिंग; चार लाखांचे सोने केले जप्त

सर्वाना उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने यातील कोमल ओमप्रकाश सिंग (वय १८. रा पाईपलाईन रोड, गंगापूररोड) हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

जखमी झालेले सर्व लोक Ertiga ने प्रवास करत होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने हा अपघात घडला. Ertiga कारमधून एकूण ७ जण प्रवास करत होते. यामध्ये तीन मुली आणि चार मुलांचा समावेश आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दोन दुचाकीचोर सात दुचाकींसह जाळ्यात

जखमींची नावे पुढीलप्रमाणे: १) हेमंत कमलाकर गायकर (वय २०), 2)  वैष्णवी मडळकर (वय २०), 3) तन्वीर मन्सुरी (वय २९ रा.पखाल रोड), ४) विकास धनागळे (वय २०), ५)  नेहा असरलीलाल सोनी (वय २८),  ६) अतिश किशोर खिडे वय (वय २०)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790