🛑 महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत दोन दिवस पाणीपुरवठा नाही…

महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत दोन दिवस पाणीपुरवठा नाही…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची सूचना दिली आहे.

नाशिक शहरातील काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.

पंचवटी विभागातील जलशुद्धीकरण केंद्रांच्या आवारात रॉ वॉटर जलवाहिनीचा वॉल दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

त्यामुळे पंचवटी विभागातील प्रभाग एक, चार, पाच व सहामधील परिसर तसेच प्रभाग क्रमांक तीनमधील काही भागात शुक्रवारी (ता. ५) दुपारी व सायंकाळी तसेच शनिवारी (ता. ६) सकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारी (ता. ६) दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

हे ही वाचा:  SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; इथे पहा निकाल…

शनिवारी दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. प्रभाग एकमधील म्हसरूळ परिसर, प्रभाग चार व पाचमधील संपूर्ण मखमलाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, पंचवटी गावठाण परिसर तसेच प्रभाग सहामधील संपूर्ण मखमलाबाद शिवार, रामवाडी, हनुमानवाडी परिसर तसेच प्रभाग तीनमधील हिरावाडी व लगतच्या परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group