नाशिक: उड्डाणपुलावर क्रुझर-कंटेनर अपघातात वृद्धा ठार
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-नाशिक महामार्गावर उड्डाणपुलावर हॉटेल सेव्हन हेवनसमोर क्रुझर व कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात वृद्ध महिला ठार झाली.
या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरील उड्डाणपुलावर क्रुझरने (एमएच ४१ व्ही ०५८२ ) रविवारी (दि. ९ जानेवरी) पाहते दाेनच्या सुमारास पुढे असलेल्या अज्ञात कंटेनरला पाठीमागून धडक दिली.
यात क्रुझरमधील धुडकूबाई नागू पवार (८२) या गंभीर जखमी झाल्या. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर या अपघातात आरती गणेश अहिरे, ताईबाई नामदेव गुजरे, भारतीबाई संजय पवार, अलकाबाई खंडू पवार (सर्व राहणार: रोहिदासवाडी, कळवण) हे जखमी झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावत पळवली कार
धक्कादायक: पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न
Offer: Buy Garbage Bags, Medium – 30 bags/roll (Pack of 6)