ओमिक्रॉनची धास्ती! नाशिकमध्ये 23 तारखेपासून नियम होणार आणखी कडक
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात लसीकरण वाढावे याकरिता आता नो वॅक्सीन नो एन्ट्री ही मोहीम राबविली जाणार आहे.
जनजागृती करूनही नागरिक लसीकरण करत नसल्याने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
येत्या २३ डिसेंबर पासून ह्या मोहिमेची सुरवात नाशिक शहरात केली जाणार आहे.
शहरातील प्रत्येक आस्थापना- खाजगी आणि सरकारी याबरोबरच औद्योगिक शेत्रातही हा नियम लागू केला जाणार आहे. सध्या राज्यात ओमीक्रॉनचे संकट आहे. याचा आढावा घेण्यासाठी आज (दि. १६ डिसेंबर २०२१) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या नियमांचे पालन न झाल्यास संबंधित आस्थापनेवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मिळालेल्या आठ दिवसात नागरिकांनी आणि आस्थापनेतील कामगारांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केलं आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६ डिसेंबर २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
या कारणामुळे हा पठ्ठ्या करायचा चेन स्नॅचिंग; याची ओळख वाचून धक्का बसेल!