नाशिकची बाजार समिती आता २४ तास चालू राहणार!

नाशिक (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीचे नविन सभपाती देविदास पिंगळे यांनी  संचलकांसोबत पेठ रोड आणि दिंडोरी रोड वरील बाजार समितीचा पाहणी दौरा केला. त्यावेळी शेतकरी, व्यापारी, हमाल यांच्या सोबत चर्चा साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथील रस्ते, पथदीप, पाण्याची टाकी आणि  यार्डाच्या इतर कामांची पाहणी केली. त्यासोबतच टोमॅटो मार्केटचे काम त्वरित पूर्ण कण्यात येईल असे देविदास पिंगळे यांनी सांगितले.

हे ही वाचा:  Nashik Breaking: दुभाजक तोडून आयशरची कारला धडक; चार जण जागीच ठार

जिल्हाभरातून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी शेतमाल घेऊन येत असल्याने रात्रीच्या वेळी येणाऱ्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या इतर अडचणी लक्षात घेऊन समस्याच्यां निराकरण करण्यासाठी २४ तास बाजार समिती चालू ठेण्यात येईल असे सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790