नाशिककरांना पुन्हा हुडहुडी! 14 अंशावरून तापमान थेट 10 अंश सेल्सिअसवर घसरले!

नाशिककरांना पुन्हा हुडहुडी! 14 अंशावरून तापमान थेट 10 अंश सेल्सिअसवर घसरले!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकसह जिल्ह्यातील तापमानात काही दिवसांपासून वाढ झाल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आज अचानक या तापमानात चार अंशांची घट होऊन नाशिककरांना हुडहुडी भरली.

कालपर्यंत थंडीचा पारा 14 अंशावर असताना आज थेट 10 अंशावर येऊन पोहचल्याने कमालीची थंडी जाणवली. शिवाय निफाड परिसरात 7.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नदी प्रदूषण व जलपर्णीच्या व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक शाश्वत आराखडा तयार होणार

मागील आठ दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यात तापमान कमी अधिक प्रमाणात वाढत असल्याने थंडीने काढता पाय घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. कधी 15 तर कधी 14 तर कधी 16 अंशावर तापमान होते. त्यामुळे शेकोट्यांचे प्रमाणही कमी झाले होते.

मात्र आज अचानक चार अंशांनी पारा घसरल्याने सकाळपासून हवेत कमालीचा गारवा पसरल्याचे जाणवले.  आज नाशिक शहराचे तापमान 10 अंशावर गेले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सामाजिक समता सप्ताहाची उत्साहात सांगता; विविध उपक्रमांद्वारे समता, बंधुता व संविधान मूल्यांचा संदेश

तर जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला 7.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यांत अचानक प्रचंड थंडी जाणवत असून सकाळी बाहेर फेरफटका मारणाऱ्यांच्या संख्येतही आज घट झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कमालीची थंडी जाणवत होती. मात्र डिसेंबर उजाडल्यानंतर तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. सोमवारपासून तापमानाचा आलेख चढता आहे. यामध्ये सोमवारी तापमान 15.4 अंश, मंगळवारी 18.8अंश,  बुधवारी 16 अंश, गुरुवारी 14.8 अंश तर आजचे तापमान ते थेट 10 अंशावर आले आहे. तर नाशिक जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला 7.2 तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790