धक्कादायक: बापानेच केला मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
नाशिक (प्रतिनिधी): बापानेच मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दुचाकीवर जात असताना वडिलांनीच मुलाला गाडीवरून ढकलून देण्याची घटना घडली.
या प्रकरणात वडिल विनोद रामसिंग नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोएल विनोद नाईक हा लासलगाव येथील सेव्हन्थ डे इंग्लिश मिडीयम मिशनरी स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. जोएलला शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या. साडेबाराच्या सुमारास त्याचे वडील विनोद रामसिंग नाईक (रा. नागरे नगर, निजामपूर, तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार ) हे २१ डिसेंबर रोजी त्याला घरी नेण्यासाठी आले होते..
जोएलला मार्केटला फिरवून आणतो असे खोटे सांगून त्याला मोटार सायकलवर बसवून नाशिक नंदुरबारच्या दिशेने घेवून गेले. मात्र जोएल याने विरोध करून गाडी थांबवा असे सांगितल्याने वडिलांनी जोएल याला जीवे मारण्याची धमकी देऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मोटार सायकलवरून ढकलून दिल्याने जोएलच्या हाता पायाला दुखापत झाली आहे.
याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील येथील विसरवाडी पोलीस ठाण्यात 3 जानेवारी २०२२ रोजी फिर्याद दिली असून सदर गुन्हा लासलगाव हद्दीत घडल्याने हा गुन्हा लासलगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलां आहे. आरोपीवर कलम ३०७, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींला अजून अटक करण्यात आलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.