धक्कादायक: नाशिकला रात्रीच्या वेळी कारमध्ये लिफ्ट देऊन प्रवासादरम्यान युवतीचा विनयभंग
नाशिक (प्रतिनिधी): रात्रीच्या वेळी लिफ्ट मागितल्यांनंतर संबंधित वाहन चालकाने तरुणीसोबत अ’श्ली’ल कृत्य केल्याचे समोर आले आहे.
संपूर्ण राज्यभरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न नित्याचा झाला असून दररोज विनयभंगासह अत्याचार, मारहाण करण्याच्या घटना समोर येत आहेत.
नाशिकमध्ये अशाच प्रकारची घटना उघडकीस आली आहे. नाशिक – औरंगाबाद महामार्गावरील नांदूरनाका ते माडसांगवी टोलनाक्या दरम्यान परवा रात्री साडेअकरा वाजेची घटना आहे.
संबंधित 21 वर्षीय मुलगी लासलगाव येथे मामाच्या घरी जाण्यासाठी नांदूरनाका येथे उभे असताना लिप्ट घेण्यासाठी गाडीला हात दिला. यावेळी एका कारचालकाने कार थांबवुन संबंधित मुलीला लिफ्ट देत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लासलगाव येथे मामाच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान एखाद्या गाडीला लिफ्ट देऊन घरी जाऊ या विचारात ती नांदुरनाका येथे उभी असताना लिप्ट घेण्यासाठी गाडीला हात दिला. यावेळी समोरून जाणाऱ्या संशयित कारचालकाने कार थांबवुन फिर्यादी यांना गाडीत बसविले. त्यानंतर काही अंतर पुढे गेल्यावर संशयित हा विचीत्र नजरेने बघत असल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास येताच संशयितास सांगितले कि, मला मांडसांगवी टोलनाका येथे उतरवून दया. यानंतर संशयिताने फिर्यादींसोबत अ’श्ली’ल वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संशयित कारचालकाने चालत्या कारमध्ये फिर्यादीचा विनयभंग करून शिवीगाळ करत ब ला त्का रा ची धमकी दिली. दरम्यान मुलीने आरडाओरड करताच टोलनाक्यावरील कर्मचारी मदतीला धावून आले, पोलिसांना पाचारण करताच मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. या प्रकरणी माडसांगवी परिसरात राहणाऱ्या चाळीस वर्षीय कारचालक संशयित पेखळेला पोलिसांनी अटक केली असून पुन्हा एकदा नाशिक शहरसह जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वाहनांना लिफ्ट मागून तुम्ही जाणार असाल तर काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेवरून दिसून येते.