नाशिकरोड सेन्ट्रल जेलमध्ये कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकरोड सेन्ट्रल जेलमध्ये कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोडच्या सेन्ट्रल जेल येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने कारागृहातच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

येथील मध्यवर्ती कारागृहात गेल्या काही दिवसापासून शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात उष्णतेचा कहर; काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता, मे मध्ये ‘रेड झोन’चा इशारा

या प्रकारामुळे मध्यवर्ती कारागृहात खळबळ उडाली आहे.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10545,10548,10551″]

सुनील भानुदास बोरसे हा कैदी गेल्या काही दिवसापासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. नैराश्यात गेल्यामुळे त्याने कारागृहातील मंडल क्रमांक सात यार्ड नंबर एक सर्कल नंबर 1 व बॅरेक क्रमांक पाच या ठिकाणी त्याने जिन्याच्या शौचालयाच्या छतावर जाऊन चादर फाडून त्याची दोरी बनवून खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

🔎 हे वाचलं का?:  शासकीय कामकाजात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर वाढवावा- अपर मुख्य सचिव विकास खारगे

सदरची घटना कारागृह कर्मचारी व अधिकाऱ्यांचा लक्षात येताच त्यांनी सदर कैद्याला हटकले. दरम्यान, या घटनेप्रकरणी कारागृहाचे कर्मचारी शेख युनूस सांडू यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि शिंदे पोलीस निरीक्षक गणेश न्याय दे व सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक हांडोरे या करीत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790